अक्षय कुमार निघालाय रामसेतूला वाचवायला ! ३ दिवसात मिशन पूर्ण होणार?

अक्षय कुमारच्या रामसेतू सिनेमाचा टीझर आज रिलीज करण्यात आलेला आहे. दिवाळीत २५ ऑक्टोबर रोजी रामसेतू रिलीज होतो आहे. या सिनेमात अक्षय कुमारसह जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात अक्षय कुमार ॲक्शन अवतारात दिसणार आहे.
अक्षयवर राम सेतू वाचवण्याचे काम दिलेले आहे आणि त्यासाठी तीनच दिवस त्याच्याकडे आहेत. पौराणिक कथेचा आधार या चित्रपटात घेतलेला आहे असे टीझरवरुन समझते आहे.अक्षय हा पुरातत्वशास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे. भारतीय संस्कृतीचा अद्भूत ठेवा जतन करण्याच्या मोहिमेवर तो असतो त्याला अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस साथ देत आहे.अक्षयला हे मिशन तीन दिवसांत पूर्ण करायचे आहे, असे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.टीझरच्या एका भागात पाण्याखाली ‘जय सिया राम’ या घोषणेचा प्रतिध्वनी कथेला सस्पेन्ससारखा ट्विस्ट देतो आहे.