आठवलेंची कविता, नायडूंना निरोप आणि काँग्रेसला टोला !

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना आज (८ ऑगस्ट) सभागृहात निरोप देण्यात आला. निरोपाच्या भाषणात एकाच खासदाराची चर्चा सर्वात जास्त झाली आहे ते आहे खासदार रामदास आठवले. रामदास आठवले आणि त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेतच. सभागृहात अनेकवेळेला आपला मुद्दा मांडताना रामदास आठवले यांनी कविता सादर केल्या आहेत. त्यांच्या कवितेतून विरोधकांवर कायम निशाणा साधला जातो.
आज उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या निरोपाच्या भाषणात रामदास आठवलेंनी खास कविता सादर केली. आठवलेंच्या खास शैलीतील कवितेवर उपराष्ट्रपतींनाही हसू आवरलं नाही. आठवले जेव्हा कविता वाचत होते तेव्हा सभागृहात एकच हसू फुटत होतं. या कवितेतून आठवलेंनी उपराष्ट्रपती यांनी केलेल्या कामाचं कौतुकं केलं मात्र त्याचबरोबर काँग्रेसला चिमटेदेखील घेतले.