एकीकडे देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज ठाकरे महायुती सरकारचा भाग होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे “राज ठाकरेंची हवा गेलीये, मी असताना महायुतीत राज ठाकरे यांची गरज नाही असं म्हणत रामदास आठवले यांनी एका नवीन चर्चेला वाट मोकळी करून दिलीये. म्हणूनच रामदास आठवले की राज ठाकरे महायुतीसाठी कोण किती महत्वाचं? तेच जाणून घेऊयात
एकही आमदार आणि एकही खासदार नसताना नेहमी राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणारी नावं म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे रामदास आठवले व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे. निवडणुकांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी रामदास आठवले यांच्या राजकारणावर टीका केली होती. तर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाशिक दौऱ्यावर असताना “राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन फायदा नाही. राज ठाकरेंची मी असताना महायुतीला गरज नाही. राज ठाकरे यांची निवडणुकीत हवा गेली आहे” असं म्हणत राज ठाकरेंवर टीका केली आहे.
राज ठाकरे व रामदास आठवले यांनी एकमेकांवर केलेल्या टीकांमुळे महायुतीसाठी नेमक कोण महत्त्वाच आहे? रामदास आठवले की राज ठाकरे. हे पहायचं झालं तर सर्वात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे या दोघांकडेही असलेल्या वोटर बेसचा. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे दलित मतांचा मोठा वोटर बेस असल्याच मानल जात. त्यांचे स्वतःचे वर्चस्व असलेले असे खास करून कोणतेही मतदारसंघ नसले, तरी देखील प्रत्येक मतदारसंघांमध्ये दलित मतदारांची संख्या निर्णायक असल्याने आठवले सोबत असतील तर ही मते महायुतीच्या बाजूने वळतात. आणि आता विचार करायचा झाला राज ठाकरे यांचा तर राज ठाकरे यांचा मराठी भाषिक मतदार आहे ज्यात काही प्रमाणात हिंदुत्ववादी विचारांच्या मतदारांचा देखील समावेश होतो. ज्यातील भाजपाकडे पहिलेच हिंदुत्ववादी मतदार मोठ्या संख्येने असल्याने राज ठाकरेंचा महायुतीला फक्त मराठी मतांच्या बाबतीत फायदा होऊ शकतो.

आता दुसरा मुद्दा आहे दोघांच्याही राजकारणातील प्रभावाचा. रामदास आठवले व राज ठाकरे या दोघांची ही व्यक्तिमत्व अतिशय परस्परविरोधी आहेत. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर रामदास आठवले यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर हवा तसा प्रभाव नाहीये पण महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांच नेतृत्व नेहमीच प्रभावी राहिल आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतरची पहिली निवडणूक सोडली तर राज ठाकरेंच्या पदरी नेहमीच निराशा आली आहे. तरी देखील राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी, एकूणच लोकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली craze या सगळ्याचा विचार करता आठवलेंच्या तुलनेने राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणावर जास्त प्रभाव टाकतात.
यासोबतच राज ठाकरे यांच ठाकरे असणं, बाळासाहेबांच्या सोबत त्यांनी व्यतीत केलेला काळ यामुळे राज ठाकरे आठवल्यांपेक्षा महाराष्ट्रात बाजी मारतात. मात्र राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी लढताना अनेकदा अप्रत्यक्षपणे अमराठी भाषिक मतदारांना दुखावल आहे. त्यामुळे ते कुठेतरी फक्त महाराष्ट्रापुरते लिमिटेड राहतात. पण तिथेच आठवलेंच्या बाबतीत असं होत नाही. उलट महाराष्ट्रा सोबतच भारताचा विचार करायचा झाला तर तिथे रामदास आठवले प्रभावी ठरतात.