असं पक्षीप्रेम पाहिलं का कधी?

प्रेम आणि आपुलकीची भाषा पशुपक्ष्यांनासुद्धा कळते. आपल्यावर प्रेम कोण करतो आणि तिरस्कार कोण करतो, आपली काळजी कोण घेतो आणि वापर कोण करतो, याची एकदा जाणीव झाली की पशुपक्षीही मैत्री करतात, बोलायला लागतात. असेच काहीसे दृष्य अंबाझरी उद्यानात पाहायला मिळते आहे. सत्पुरुष वानखेडे असं त्या पशुप्रेमीचे नाव आहे. ते दुचाकी दुरुस्तीचे काम करतात. लहानपणापासूनच पशुंवर त्यांचे प्रेम आहे. वाढत्या वयासोबत पक्ष्यांवरील प्रेमही वाढत गेले. पुढे अंबाझरी उद्यानात जाण्याचा क्रम सुरू झाला. पशुपक्षी भेटत गेले आणि मैत्री फुलत गेली. त्यांच्या मैत्रीला 20 वर्षे झाली आहेत.

ते वेळेत पोहोचले नाही.तर पक्षी रुसतात.पक्षी त्यांच्याशी गुजगोष्टीही करतात. गेल्या २० वर्षापासून सत्पुरुष वानखेडे नियमित अंबाझरी गार्डनमध्ये पशुपक्षांवर अशी माया करतात. निसर्गाशी समरस वानखेडेंचे पक्षीप्रेम खरंच अनुकरणीय आहे. तरूण भारतचे पत्रकार शैलेष भोयर यांनी ही हटके स्टोरी केली असून Pktakey यांनी ट्विट केलीय. 

पशुपक्ष्यांसाठी दररोज दोनशे ते अडीचशे रुपयांचे धान्य लागते.वानखेडे ते सर्व धान्य खरेदी करतात.अंबाझरी उद्यानातील सर्व प्रजातींचे पशुपक्षी ते धान्य खायला येतात.धान्य संपेपर्यंत ते थांबलेले असतात. गेल्या वीस वर्षांपासूनचा हा क्रम नित्याने सुरू आहे. दुकानदारानेही कधी पैशांसाठी तगादा लावला नाही. धान्य खरेदीसाठी बरीच मदत झाली, असे सत्पुरुष वानखेडे सांगतात. सकाळी उद्यानात फिरायला आलेले काही टवाळखोर पक्ष्यांना त्रास देतात. त्यामुळे वारंवार जागा बदलावी लागली, असेही वानखेडे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.