रणवीर सिंग होणार शाहरुख खानचा शेजारी

आपल्या प्रोफेशनल सतत चर्चेत असणाऱ्या रणवीरनं आता कोट्यवधी रुपयांचं आलिशान घर खरेदी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.रणवीर सिंग नेहमीच लग्झरी लाइफ जगताना दिसतो. त्याचे स्टायलिश लुक अनेकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतात. आता रणवीरनं मुंबईतील वांद्रे स्थित रेसिडेन्शियल टॉवर सागर रेशममध्ये एक आलिशान आपार्टमेंट विकत घेतलं आहे. विशेष म्हणजे हे आपार्टमेंट शाहरुख खानचं घर मन्नत आणि सलमान खानचं ‘गॅलॅक्सी’ अपार्टमेंट याच्या मधोमध आहे. म्हणजेच आता हे तीन सुपरस्टार आता एकमेकांचे शेजारी झाले आहेत. तिघांचीही घरं आता आजपासच्या भागात आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार रणवीर सिंगच्या या आलिशान घराची किंमत ११९ कोटी रुपये एवढी असून त्याचं हे घर १६ व्या मजल्यापासून ते १९ व्या मजल्यापर्यंत आहे. म्हणजे रणवीरनं एकूण ४ मजले विकत घेतले आहेत. तो आता या ४ मजल्यांचा मालक आहे. हे घर एकूण ११, २६६ स्क्वेअर फूटच्या कार्पेट एरियामध्ये आहे. याशिवाय १,३०० स्केअर फूटचं छत आहे आणि या बिल्डिंगमध्ये १९ कार पार्क करण्याची सुविधा देखील रणवीरला मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रणवीर सिंगनं ११८.९४ कोटी रुपये आपार्टमेंट विकत घेताना दिले आहेत आणि ७.१२ कोटी रजिस्ट्रेशनच्या स्टॅम्प ड्यूटीसाठी दिले आहे. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना वांद्रे येथील रियलटर्सनं सांगितलं की ही बिल्डिंग रिडेव्हलप करण्यात आली आहेत. खालचे सर्व मजले हे जुन्या रेसिडंटसाठी देण्यात आले आहेत तर १६ मजला हा ४ बीएचके आहे. तर इतर तीन मजले हे पेंटहाऊस आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.