वहिनीसाहेब ठाकरे सेनेला बळ देणार !

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेचा कसोटीचा काळ सुरु झाला. अनेक खासदार, नेते, पदाधिकारी शिवसेनेला सोडून जात असताना आता शिवसेनेला भरभक्कम पाठिंबा देण्यासाठी एक व्यक्ती मैदानात उतरली आहे ती म्हणजे रश्मी उद्धव ठाकरे, अर्थात मातोश्रीच्या वहिनीसाहेब ! गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा वावर वाढलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलंय अशावेळी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दोनवेळा धडक देण्याऱ्या रश्मीवहिनीच होत्या.

आनंद दिघे यांच्या देवीच्या दर्शनाला जाऊन त्यांनी आरती केली, बरं त्या एवढ्यावर थांबल्या नाहीत. तर ठाण्याहून परतताना तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्या घरी गेल्या आणि कुटुंबियांची मायेनं विचारपूस केली. आता तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टवरसु्द्धा रश्मी ठाकरे यांचा फोटो धडकला आहे. रविवारी शिवसेना भवनातील भवानी देवीचं दर्शन घेवून त्यांनी आरती केली त्यामुळे रश्मी ठाकरे यांचा शिवसेनेला वावर वाढल्याचे स्पष्ट दिसतंय.

तुम्हाला आठवत असेल राणा दाम्पत्याविरोधात झालेल्या आंदोलनावेळी फायर आज्जींना भेटायला त्या उद्धव ठाकरेंसोबत गेल्या होत्या. आता कुठेतरी शिवसैनिक आणि ठाकरे यांच्यातील तुटलेले धागे जोडण्यासाठी रश्मी वहिनी सक्रिय होत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. आजारपणामुळे उद्धव ठाकरे जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आदित्य ठाकरे एकटे पडण्याची शक्यता आहे. राजकीय चक्रव्युहात सध्या शिवसेना अडकलेली आहे. रश्मी ठाकरेंच्या सहभागामुळे शिवसेनेच्या महिला ब्रिगेडला बळ मिळण्याची आशा आहे.आगामी महापालिका निवडणुकित रश्मी ठाकरे मोलाची भूमिका पार पाडू शकतात अशी चर्चा आहे. बाळासाहेब ठाकरे असताना माँसाहेब मीनाताई ठाकरेंनी मातोश्रीवरील जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. आता शिवसेना राजकीय चक्रव्युव्हात अडकलेली असताना केवळ मातोश्रीवर बसून भागणार नाही. आता शिवसेनेच्या मेळाव्यात प्रेक्षकांमध्ये बसणाऱ्या रश्मी वहिनी आता व्यासपीठावर विराजमान होणार का याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.