रश्मिकाचंही शुभमंगल ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अडकणार लग्नबंधनात?

तेलुगू चित्रपटांचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबतच्या त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरुच असतात. काही दिंवसांपुर्वी हे दोघे मुंबईत फिरताना दिसले होते. खरंतर मुंबईमध्ये दोघांची डेट होती अशी चर्चा रंगलेली होती. दरम्यान एक मोठी बातमी समोर आलेली आहे.
या वर्षाच्या अखेरीस विजय आणि रश्मिका विवाह करू शकतात अशी चर्चा सोशल मीडियावर होते आहे. चाहते दोन्ही अभिनेत्यांच्या लग्नापर्यंत पोहोचले असले तरी अद्याप रश्मिका किंवा विजय या दोघांनीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिलेला नाही. रश्मिका आणि विजयने ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या दोन्ही चित्रपटात त्यांची जोडी खूप पसंत केली जात होती. तेव्हापासून रश्मिका आणि विजय यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. यावर आता दोघांकडून लवकरच प्रतिक्रिया येतील अशी अपेक्षा आहे.