रश्मिकाने शेअर केली ती गोष्ट, प्रत्येकाने शिकायला हवी

नॅशनल क्रश असे म्हटले की डोळ्यासमोर येते साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना..तिचा एक मोठा चाहता वर्ग आहे. तिने एका मुलाखतीत आपल्या रोजच्या लाईफस्टाईलबद्दल माहिती दिली. तिने काही अशा गोष्टी शेअर केल्या ज्या खरंतर प्रत्येकाला शिकायला हव्यात. रश्मिका आयुष्यातील खूप छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देते. तिनं सांगितलं की ती तिच्या कुटुंबातील मोठ्यांचेच नाही तर घरात काम करणाऱ्या मदतनीसांच्या देखील पाया पडून आशीर्वाद घेते.
रश्मिका मंदाना साऊथ आणि हिंदी सिनेमांची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण असं असलं तरी तिच्या आई-वडीलांना याचा गर्व नाही. ते तिला खूप साधारण मुलीसारखेच वागवतात. मी घरी आल्यावर माझ्या डायरीत खूप छोट्या छोट्या गोष्टींची नोंद करून ठेवते. माझी एक सवय आहे की मला आदर म्हणून कुणाच्याही पाया पडायला लाज वाट नाही. मी माझ्या घरात काम करणाऱ्या मदतनीसांच्या देखील पाया पडते. मी तिथे भेदभाव करत नाही. मी सगळ्यांचा आदर करते..मी अशीच आहे असे रश्मिकाने बाजार इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
रश्मिकाला जेव्हा विचारलं गेलं, ‘तुझ्या आई-वडीलांना तुझा खूप अभिमान वाटत असेला ना?’ तेव्हा रश्मिका पटकन म्हणाली, नाही…कारण माझं कुटुंब सिनेमाशी कनेक्टेड नाही.त्यांना नाही माहित त्यांची मुलगी काय करतेय. पण जेव्हा मला पुरस्कार मिळतो तेव्हा मात्र ते खूश होतात. असे रश्मिकाने सांगितले.