जग्गनाथ रथोत्सव, भाविकांची अलोट गर्दी

जग्गनाथ पुरीचा रथोत्सव १ जुलैपासून सुरु झाला आहे.उत्साही चेहरे, गर्दीने भरलेली दुकाने आणि आनंदी कारागीर ही पुरीतील रथयात्रेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.
लाखो भाविकांची गर्दी
ओडिशातील पुरी शहरातील हा सर्वात प्रमुख हिंदू सण आहे. हा उत्सव दरवर्षी जून किंवा जुलै महिन्यात शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी होतो. भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या भावंडांना घेऊन जाणाऱ्या तीन लाकडी रथांना मुख्य मार्गावर खेचण्यासाठी देशभरातून सुमारे दहा लाख भाविकांनी शुक्रवारी पुरीच्या मंदिरात गर्दी केली होती. या रथ उत्सवात होणारी गर्दी लक्षात घेत ओडिशा पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचं पाहायला मिळालं. करोनानंतर दोन वर्षांनी यावेळी रथयात्रेत भाविकांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे.
प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी समुद्रकिनाऱ्यावर एक भव्य देखावा साकारला आहे.”या रथयात्रेत आपण “से नो टू सिंगल-युज प्लास्टिक” अशी शपथ घेऊया असा संदेश त्यात देण्यात आला आहे.