क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांसाठी मोठी बातमी !

क्रेडीट आणि डेबिट कार्डधारकांसाठी मोठी बातमी आहे. सायबर फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 1 ऑक्टोबरपासून आरबीआयने क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापर करणाऱ्यांसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर कार्डधारकांना अधिक सुविधा मिळेल असे आरबीआयचे म्हणणे आहे. 

तुम्ही जेव्हा एखादा व्यवहार डेबिट किंवा क्रेडिट कार्डने करता तेव्हा 16-अंकी कार्ड क्रमांक, कार्डची मुदत, सीव्हीव्ही आणि ओटीपी द्यावा लागतो. आता टोकनायझेशन कार्ड तपशील टोकन नावाच्या पर्यायी कोडमध्ये बदलण्यात आलेले आहे.हे टोकन कार्ड, टोकन विनंतीसाठी आणि डिव्हाइसवर अवलंबून असणार आहे. जेव्हा तुम्ही तुमचे डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती टोकन स्वरूपात शेअर करणार तेव्हा ऱसवणूकिचा धोका कमी असणार आहे. यामुळे 16-अंकी डेबिट, क्रेडिट कार्ड क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज नाही. 

या नव्या नियमामुळे तुमची कार्ड माहिती एका पर्यायी कोडमध्ये रूपांतरित केली जाईल. या कोडच्या मदतीने पेमेंट करणे शक्य होईल. मात्र या प्रक्रियेत कार्डचा CVV नंबर आणि वन टाईम पासवर्ड गरजेचा आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या वेबसाइट्ससाठी एकाच कार्डसाठी वेगवेगळे टोकन क्रमांक दिले जाणार आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.