विजय देवरकोंडाचा लूक पाहून चाहते हैराण !

‘लाइगर’ चित्रपटातील विजय देवरकोंडाचा जबरदस्त लूक समोर आला आहे. विजयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करून झलक दिली आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा व्यतिरिक्त अनन्या पांडे देखील मुख्य भूमिकेत आहे. एकीकडे विजय या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर दुसरीकडे अनन्या पांडेही ‘लाइगर’ मधून साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे.
विजय सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्याने लाइगर चित्रपटातील लुकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या त्याने शेअर केलेल्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या चित्रात अभिनेता कपड्यांशिवाय दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत विजयने चित्रपटात काम करतानाचा अनुभव थोडक्यात शेअर केला. फोटो पोस्ट करत विजयने लिहिले की, “एक चित्रपट ज्याने माझे सर्व काही घेतले. ही माझी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सर्वात आव्हानात्मक भूमिका आहे. त्यासाठी मी माझे सर्वस्व दिले आहे! लवकरच येत आहे”.
विजय आणि अनन्या व्यतिरिक्त या चित्रपटात रम्या कृष्णा, रोनित रॉय, अली, मकरंद देशपांडे आणि विष्णू रेड्डी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. २५ ऑगस्ट २०२२ रोजी ‘लाइगर’ हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.