‘तो’ परत येतोय ! मुकेश अंबानींनी केली मोठी घोषणा

तुम्हाला कॅम्पा कोला आठवतो आहे का तोच तो ज्याने ८० आणि ९० च्या दशकात बाजार गाजवला होता. एक काळ गाजवणारा कॅम्पा कोला आता पुन्हा बाजारात येत आहे. हो अगदी बरोबर वाचलं तुम्ही, रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी कोला बाजारात उतरण्याच्या तयारीत आहेत. ऑक्टोबरमध्ये कॅम्पा कोला बाजारात पुनरागमन करेल. रिलायन्सनं प्योर ड्रिंक समूहासोबत २२ कोटींचा करार करून कॅम्पा कोला ब्रँड खरेदी केला आहे.
कॅम्पा कोला या ब्रँडचं अधिग्रहण मुकेश अंबानींनी केलंय.रिलायन्स रिटेल या ब्रँडला रिलॉन्च करेल. रिलायन्स रिटेलचं नेतृत्त्व मुकेश अंबानी यांच्या कन्या ईशा अंबानी करत आहेत.ऑक्टोबरमध्ये कॅम्पा कोला बाजारात पुनरागमन करेल. रिलायन्सनं प्योर ड्रिंक समूहासोबत २२ कोटींचा करार करून कॅम्पा कोला ब्रँड खरेदी केला आहे.रिलायन्स उद्योग एफएमसीजी क्षेत्रात विस्तार करण्याच्या तयारीत आहे. त्याचसाठी रिलायन्सनं कॅम्प कोला ब्रँड खरेदी केला आहे. कधीकाळी बाजारात अग्रगण्य असलेला ब्रँड खरेदी करून रिलायन्सनं मोठा डाव टाकला आहे. त्यामुळे लवकरच कोला बाजारात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपर्यंत कॅम्पा कोला नव्या रुपात तीन फ्लेवरमध्ये बाजारात येऊ शकतो. कोलासोबतच लेमन आणि ऑरेंज फ्लेवर लॉन्च करण्यात येईल.
रिलायन्स सुरुवातीला कॅम्पा कोला आपल्या रिटेल स्टोअर्स, जियोमार्ट आणि किराणा स्टोर्सवर विक्रीस ठेवेल. एफएमसीजी क्षेत्रातील व्यवसाय वाढवण्याच्या हेतूनं रिलायन्सनं कॅम्पा कोलाची खरेदी केली आहे.