एका फोन अन् संतोष बांगरांच्या जीवाला घोर? 

अगदी ऐनवेळी शिंदे गटात सहभागी होणारे आमदार संतोष बांगर त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात.आता त्यांची एक ऑडिओ क्लिप जोरदार व्हायरल होते आहे त्यात आमदार बांगर एका डॉक्टरांना दम देतानाचे त्यांचे संभाषण ऐकायला येते आहे. ही क्लिप जरी व्हायरल झालेली असली तर आम्ही त्या क्लिपची पुष्टी करत नाही.

काय आहे प्रकरण

हिंगोली शहरातील माधव हॉस्पीलटलमध्ये पैशासाठी महिलेचा मृतदेह अडविला जातोय असा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर आमदार बांगर यांनी त्या डॉक्टरांना फोन करुन खडसावलं.कळमनुरी तालुक्यातील झरा येथील जिजाबाई संभाजी तडस (70) यांची प्रकृती जास्तच बिघडली म्हणून त्यांना माधव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना आपल्याकडील योजनेअंतर्गत उपचार केले जातील तुम्ही त्यांना याच हॉस्पिटलमध्ये ठेवा असे सांगण्यात आले असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. नातेवाईकांकडून तीस हजार रुपये घेतले असेही नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान शनिवारी ( २३ जुलै) जिजाबाई तडस यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.आता त्या योजनेत रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांचे नाव आले नाही असे सांगत डॉक्टरांनी उर्वरीत रक्कम भरा असे सांगितले.मृत महिलेच्या नातेवाईकांनी असा आरोप केला की डॉक्टरांनी थेट पाच हजार रुपयांची मागणी केली. 

या प्रकारानंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी थेट आमदार संतोष बांगर यांच्याशी संपर्क केला. त्यांना फोनद्वारे सगळी माहिती दिली. हा प्रकार ऐकून संतोष बांगर संतप्त झाले आणि त्यांनी डॉ. बगडीया यांना काॅल करून त्यांची कानउघाडणी केली. या दोघांचे संभाषण व्हायरल झाले असून माणूस मेल्यावरही पैसे घेता का एक रुपया द्यायचा नाही असे वक्तव्य फोनच्या संभाषणातून ऐकायला मिळते आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.