रोहिंग्या व्यक्तींचा भारतातील घुसखोरीचा प्रश्न काही आपल्यासाठी नवीन नाही, पण पूर्वेकडील व ईशान्येकडील राज्यांमध्ये घुसखोरी करणाऱ्या या रोहिंग्यानीं आता मात्र थेट पुण्यामध्येच आपला संसार थाटला आहे. त्यामुळे म्यानमार मधून थेट पुण्यात येऊन आपला संसार थाटणाऱ्या या रोहिंग्याचं नेमकं काय प्रकरण आहे तेच जाणून घेऊया
रोहिंग्या हे इंडो-आर्यन वंशाचे लोक मानले जातात. म्यानमारच्या रकेन प्रांतातील हे मूळ निवासी आहेत. रोहिंग्या ही त्यांची भाषा असून ब्रिटिश शासन काळात ते बांगलादेशातून म्यानमारमध्ये विस्थापित झाल्याचे इतिहास तज्ज्ञांचे मत आहे. काही लोक १९४८ मध्ये म्यानमारला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर काही १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळी रकेनला स्थायिक झाले. पण जनरल विन सरकारच्या कार्यकाळात १९८२ मध्ये त्यांना म्यानमारचे नागरिक मानण्यास नकार दिला होता. तेव्हापासून यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा प्रलंबित असून अनेकजण म्यानमार मधून चांगल्या जीवनाच्या शोधात भारतामध्ये बेकायदेशीर पणे घुसखोरी करतात.
जुलै महिन्याच्या दरम्यान चार रोहिंग्या हे म्यानमारमधून बांगलादेशात आले. आणि तेथून त्यांनी बेकायदेशीर पणे भारतात घुसखोरी केली. भारतात आल्यानंतर कोलकत्ता येथे हव तसं काम न मिळाल्याने त्यांनी थेट पुणे गाठल. पुण्यातील देहूरोड परिसरातील गांधीनगर येथील पंडित चाळीत हे चारही लोक बेकायदेशीर पद्धतीने राहत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळताच पोलिसांनी या चौघांवर कारवाई केली. यादरम्यान यांच्यातील एक असलेल्या मुजल्लीम खान याने पुण्यात चंद्रभागा कांबळे यांच्याकडून 80 हजार रुपयांना 600 चौरस फूट जागा खरेदी केली व त्या जागेवर घर बांधून संसार देखील थाटला. तर जागा विकत घेण्यासाठी त्यांनी बनावट आधार कार्ड, बनावट पासपोर्ट व इतर बनावट कागदपत्रे वापरली असल्याची माहिती आहे.
मुजल्लीम खान याने म्यानमार येथील इस्लामिक संस्थेत मौलानाचा कोर्स पूर्ण केला. तो आणि त्याची पत्नी दोन मुलांसह म्यानमार येथे राहत होता. त्यानंतर 2022 मध्ये तो कुटुंबासह बांगलादेशात राहायला गेला. मात्र बांगलादेशात त्याला काम मिळाले नाही. त्यामुळे तो भारतात आला. पुण्यात बेकायदेशीर पद्धतीनं राहत असताना तो भिवंडीतून कपडे आणून देहूरोड परिसरात कपडे विकण्याचा व्यवसाय करत होता. भिवंडीत असताना पाचशे रुपये देऊन त्याने बनावट आधार कार्ड तयार केलं आणि त्यातून त्याने भारतीय असल्याची ओळख सगळ्यांना पटवून दिली. त्यानंतर त्याने देहूरोड भागात सुपारीचा व्यवसाय सुरु केला. तसेच तो इतर रोहिंग्यांना देखील भारतात येण्यासाठी मदत करत होता, अशी माहिती समोर आली आहे.
हि सर्व बाब समोर येताच पोलिसांकडून मुजल्लीम खान याच्यावर कारवाई करण्यात आली असून सध्या तो जामिनावर बाहेर आहे. या प्रकरणामुळे घुसखोरांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय? ते कंमेंट करून नक्की सांगा.