बुडत्या Bollywood ला क्रिकेटर्सचा आधार !!

सध्या बॉलिवूडचे अनेक चित्रपट फ्लॉप होतोयेत दरम्यान आणखी एक बॉलिवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात जे सेलिब्रिटी दिसणार आहे हे पाहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि कॉमेडियन कपिल शर्मा देखील तिच्यासोबत दिसणार आहेत.
या चित्रपटाचे नाव ‘मेगा ब्लॉकबस्टर’ आहे.रश्मिका मंदान्ना ही दाक्षिण चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
रश्मिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. हा लूक शेअर करत रश्मिकानं ‘फन स्टफ’ असं कॅप्शन दिलंय. तर दुसरीकडे कपिलनं कमेंट करत त्याच्या लूकची स्तुती केलीय.रोहित शर्मानं लूक शेअर करत बॉलिवूडमध्ये एण्ट्रीची आनंदाची बातमी चाहत्यांना दिलीय.