नरेंद्र मोदींच्या ‘अच्छे दिन’ बदद्ल RSS ला शंका?

‘अच्छे दिन आयेंगे’ ! नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार त्या आधीपासून ही घोषणा करण्यात आली होती. अच्छे दिनच्या याच नाऱ्याभोवती भाजपनं लोकसभा निवडणुकीची रणनितीच आखली होती. पण मोदींच्या याच अच्छे दिनबदद्ल गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. हे प्रश्न काँग्रेस किंवा इतर पक्षाने उपस्थित केलेले नाहीत तर खुद्द भाजपची मातृसंघटना असणाऱ्या RSS कडून उपस्थित करण्यात आलेले आहेत. यामुळे मोदी सरकार आणि RSS मधील वाद चव्हाट्यावर आलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालाचा हवाला देत संघाने केंद्र सरकारच्या कार्यक्षमतेवरच बोट ठेवलंय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातल्या सध्या ज्वलंत बनलेल्या मुद्द्यांवरच बोट ठेवलंय. आरएसएसबरोबर सलग्न असणारी स्वदेशी जागरण मंच ही स्वदेशीचा पुरस्कार, आग्रह धरणारी संघटना आहे. याच मंचानं दिल्लीत २ ऑक्टोबरला ‘स्वावलंबी भारत अभियान’ या उपक्रमांतर्गत व्याख्यानमाला आयोजित केली होती. यामध्ये RSS चे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी मार्गदर्शन केलं. त्यात होसबाळे यांनी चक्क गरीबीचे आकडे मांडले. २० कोटी लोक अद्याप दारिद्रयरेषेखाली जगतात. २३ कोटी लोकांचं रोजचं उत्पन्न ३७५ रुपयांहून कमी आहे. देशात ४ कोटी बेरोजगार आहेत. देशाचा बेरोजगारी दर ७.६ टक्के असल्याची कामगार सर्वेक्षणाची आकडेवारी आहे असे होसबाळे म्हणाले. तसेच काही प्रमाणात सरकारची अकार्यक्षमताही याला जबाबदार आहे असेही त्यांनी सांगितले.

आता होसबाळे यांनीच सरकारच्या कार्यक्षमेवर बोट ठेवलं आहे. वाढती बेरोजगारी, गरिबी आणि आर्थिक विषमतेबद्दल चिंता व्यक्त केल्यानं भाजपच्या सत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं म्हटलं जातंय. नरेंद्र मोदींनी अच्छे दिनचा वादा केला होता, पण आता संघाने त्यावर शंका घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली असून या सगळ्या चर्चांना वेगळं महत्त्व प्राप्त होताना दिसतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.