पवारांमुळे अमित शहांना मिळाला होता जामीन? शिवसेनेचा गौप्यस्फोट

शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून नेहमीच विरोधकांवर टीकास्त्र सोडलं जातं पण आजच्या सामनातून एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय. मोदी आणि पवार यांच्यातील सुसंवादामुळे केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांना जामीन मिळाला असा गौप्यस्फोट सामनातून करण्यात आलाय. तसं पाहिलं तर केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी आणि अमित शहांच्या मागे हात धुऊन लागलंय. 

आजच्या सामनामधून अमित शाह यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. अमित शाह हे वारंवार शिवसेनेच्या बाबतीत ही अशी भाषा वापरतात. हा त्यांच्या मनातील महाराष्ट्राविषयीचा द्वेष आहे. खरं तर त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी सदैव कृतज्ञ राहायला हवे. केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. हा गौप्यस्फोट नसून सत्य आहे असं म्हटलं आहे. 

आणखी एका प्रकरणात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सरकार’ पद्धतीने भूमिका करून अमित शहा यांना त्या काळात मदत होईल अशी व्यवस्था केली होती. असा खुलासा शिवसेनेने मुखपत्र सामनातून करण्यात आलाय. तसेच दोन्ही प्रसंगावर स्वतंत्र लिखाण संजय राऊतच करू शकतील. असदेखील सामनातून सांगण्यात आलंय.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेस गाडण्याची भाषा महाराष्ट्रविरोधी आहे. बाळासाहेब ठाकरेंशी आणि त्यांच्या विचारांशी बेइमानी आहे. अमित शाह मुंबईत येऊन अशा विषाची पेरणी करतात आणि भाजपमधील मराठे त्यावर टाळय़ा वाजवतात. भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र अमित शाहंनी शिवसेना गाडण्याची आणि ठाकऱ्यांना धडा शिकविण्याची भाषा सतत करीत राहावे. असे सांगत शिवसेनेने खोचक सल्लादेखील सामनातून देण्यात आलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.