“त्या थडग्यावर तुमची नातवंडंही थुंकतील” उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर जळजळीत टीका

शिवसेनेसाठी बंड नवीन नाही पण एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे मात्र शिवसेनेत उभी फूट पडली. राज्यातील ठाकरे सरकार कोसळले आणि शिंदे सरकार आले. शिवसेनेवर येणारी संकटे पाहून आता शिवसेनेचे कसे होणार असा प्रश्न पडलेला असताना ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावही मिळाले आहे. आजच्या सामना अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आले असून विरोधकांवर जोरदार प्रहार करण्यात आलेला आहे.

सत्याला आणि खुनाला वाचा फुटतेच असं म्हणतात. मिंधे-फडणवीस युगात असत्यालाही वाचा फुटू लागली आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आणि शिवसेना नाव नाव वापरण्यास बंदी करण्यात आली. या अन्यायाविरोधात महाराष्ट्राचं मन पेटून उठलं असताना मिंधे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षणणमंत्री केसरकर यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे सत्य आणि न्यायाचा विजय आहे असं म्हटलं आहे. जगात न्याय आहे असे केसरकरसारख्या बाजारबुणग्याला वाटणं साहजिक आहे असे म्हणत शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात आलेला आहे. भाजप आणि त्यांचे सूत्रधार नामर्द आहेत. त्यांना मुंबईवर ताबा मिळवायचा आहे. आम्ही सांगितलं की मुंबई महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र देशाचा आहे असेही सामनात म्हटले आहे.

बंडकोरांवर टीका करताना महाराष्ट्राच्या जनतेने खोक्यांच्या चिता पेटवल्या की गेंड्याची कातडीही जळून जाईल. छे छे यांना जाळायचं कसं? ही तर अफझल खान आणि औरंगजेबाच्या विचारांची अवलाद असे म्हणत महाराष्ट्राच्या दुश्मनांना दफन करायला हवं आणि त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढंच लिहायचं येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचं गाडलं आहे. त्या थडग्यावर तुमची नातवंडंही थुंकतील असे जळजळीत शब्द सामनात वापरले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.