सारा तेंडुलकरचा ‘सर्वात वाईट’ फोटो ! स्वत:च शेअर करत म्हणाली…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप ऍक्टीव्ह असते. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षापासून ती जगप्रसिद्ध ब्रँण्डसाठी शूट करते आहे. सॅमसंग आणि वोग मॅगझिनसाठीच्या जाहिरातीत ती दिसली होती. त्यामुळे सारा केवळ मॉडेलच नव्हे तर इंटरनेट सेन्सेशनही बनली आहे. सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा आहे कारण तिने एक फोटो शेअर करत त्याला ‘सर्वात वाईट’ असे म्हटले आहे.
सारा तेंडुलकरने युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडनमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. अलीकडेच ती तिच्या कॉलेजमध्ये गेली होती आणि यावेळी ती काहीशी भावुकही झाली.तेथिल फोटो तिने शेअर केले आहेत त्यात तिच्या कॉलेज कॅम्पसचा फोटो शेअर केलाय तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने कॉलेज आयडी शेअर केलं आहे. या फोटोला तिने ‘सर्वात वाईट’ म्हटले आहे. तो फोटो तिने मांजरीचा इमोजी वापरुन लपवला आहे. यावेळी तिने असं म्हटलं की, ‘Yayyy, पण का हे फोटो सर्वात वाईट असतात’.
साराला जेव्हा पदवी मिळाली त्यावेळी या सोहळ्याला सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत उपस्थित होता. सारा २०१८ मध्ये पदवीधर झालेली, आता ती चार वर्षांनी पहिल्यांदाच लंडनमधील तिच्या अल्मा मॅटर युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये पुन्हा एकदा गेलेली. यावेळी तिने काही फोटो इन्स्टास्टोरीवर शेअर केले आहेत.