सलमान खानच्या नव्या लूकवर चाहते फिदा

सलमान खानचा सिनेमा कधी येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. २०२२ मध्ये रिलीज होणाऱ्या सिनेमांची घोषणा भाईजान यांनी आधीच केलेली आहे. खरंतर ईदच्या मुहुर्तावर सलमान खानचा सिनेमा रिलीज होत असतो, पण यंदा मात्र ईदला भाईजानचा सिनेमा रिलीज झाला नाही त्यामुळे सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत सलमान खानचा सिनेमा कधी येणार. सध्या सलमान खान लेह-लडाखमध्ये असून त्याच्या आगामी सिनेमचा चित्रकरण तिथे सुरु आहे. या चित्रिकरणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत त्यात सलमानचा लूक पाहून चाहत्यांना आर्श्चयाचा धक्काच बसला आहे.
सलमानने इन्स्टावर त्याचा एक फोटो शेअर केलाय. चाहत्यांनी सलमानच्या फोटोला भरभरुन लाईक्स दिले आहेत.सलमान कॅमेराकडे पाठ करून उभा आहे. त्याने काळी जीन्स, काळा टीशर्ट आणि काळे शूज घातलेले आहेत. त्याच्यापासून काही अंतरावर बाईक आहे. या फोटोत सलमानचे केस लांब दिसत असून यामुळेच या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधलेले आहे.
हा फोटो शेअर करून सलमान खानने फक्त लेह-लडाख इतकंच लिहिलं आहे. सलमानने शेअर केलेला फोटो भाईजान या सिनेमातील असून ३० डिसेंबर रोजी तो रिलीज होणार आहे. यात सलमान सोबत पूजा हेगडे दिसणार आहे.