Samantha ठणठणीत ! अभिनेत्री वेगळ्याच कारणासाठी पोहोचलीय अमेरिकेत

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची सध्या जोरदार चर्चा सुरु झालेली आहे. याचं कारण आहे समंथाचा कोणाबरोबरही सध्या संपर्क नाहीए. तिने जगापासून स्वतःला लांब ठेवल्यामुळे चाहते काळजी करत आहेत त्याचबरोबर अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आलेली आहे. तिला त्वचेचा आजार झालाय त्यावर उपचार घेण्यासाठी ती परदेशात गेलीय असे काहीजण म्हणतायेत. तर काहीजण म्हणतायेत डॉक्टरांनी तिला गर्दी टाळण्याचा सल्ला दिलाय म्हणून तीने विजय देवरकोंडासोबतच्या ‘खुशी’ सिनेमाचं शूटिंगही पुढे ढकलंय.

दरम्यान या सगळ्या अफवा असून समंथाच्या मॅनेजरने समोर येऊन सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. समंथा रुथ प्रभू सध्या अमेरिकेत असून आगामी वेबसीरिज ‘सिटाडेल’ साठी अमेरिकेत गेलीय.तिच्या जवळच्या सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की अमेरिकेत ‘सिटाडेल’ मधील आपल्या व्यक्तिरेखेची तयारी समंथा करते आहे. व्यक्तीरेखेला शोभेल अशी फिटनेस बनवण्यात सध्या ती तिकडे व्यस्त आहे. एकदम शिस्तीचं लाइफस्टाईल समंथा सध्या फॉलो करत आहे असंही सांगितलं जातंय. समंथा ‘सिटाडेल’ मध्ये वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या नवीन सिरीजविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.