ठाकरेंच्या ‘मशाल’ची परीक्षा ! समता पक्षाची दिल्ली हायकोर्टात धाव

उद्धव ठाकरे यांच्या मागे लागलेली विघ्न कमी होण्याचे नाव घेत नाहीत अशीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतल्या ठाकरे गटाला तात्पुरते म्हणून मशाल चिन्ह दिले, पण आता धनुष्यबाणासारखे मशाल चिन्ह जाणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. समता पक्षाने ठाकरे गटाला अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत मशाल चिन्ह मिळू नये यासाठी दिल्ली हायकोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतलाय.
समता पक्ष आज (शनिवार) कोर्टात याचिका दाखल करणार आहे. 2004 मध्ये समता पक्षाची राज्यातली मान्यता काढण्यात आलेली आहे. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला मशाल हे चिन्ह देण्यात आले. या चिन्हावर आता ठाकरेंची शिवसेना प्रथमच निवडणूक लढवत आहे मात्र समता पक्षाने याच चिन्हावर दावा केल्याने कोर्टात काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.अंधेरीतील पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना मशाल चिन्हावर निवडणूक लढणार आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आलीय.निवडणुकीचं बिगुल वाजलं असून प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे पण ठाकरेंसमोर आता नवं विघ्न येऊन उभं राहिलं आहे.