संभाजीराजे छत्रपती सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला

राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर मोठे बदल पहायला मिळत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असले तरी देवेंद्र फडणवीस राज्याच्या सत्तेत केंद्रस्थानी आहेत असे तरी सध्याचे चित्र आहे. अनेक मोठे नेते फडणवीस यांना जावून भेटत आहेत आता संभाजीराजे छत्रपती यांचाही त्यात समावेश झालाय.संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा नेमका तपशील आणि उद्देश अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, या भेटीदरम्यान मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
आता संभाजीराजे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार का, हे पाहावे लागेल. राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने संभाजीराजे यांना पाठिंबा न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस संभाजीराजे यांच्याबाबत नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.