दोन्ही ‘राजे’ एकाच दिवशी पुण्यात, मिशन काय?

आज पुण्यात चक्क दोन राजे एकाच दिवशी आल्याचा योग जुळून आला होता. आपण बोलतो आहोत संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल ! राज्याचे कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर पुण्यात आले होते तेव्हा उदयनराजे यांनी त्यांची भेट घेतलीय. यावेळी उदयनराजे यांनी शिवसेनेवर परखड भाष्य केलं.’शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन करणारी शिवसेना म्हणायचं का ती माझी आहे? तसं असेल तर माझी म्हटली पाहिजे.हा संपूर्ण महाराष्ट्र या लोकशाहीत लोकांचा आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा लोकांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःला कधीच राजे म्हटले नाही. पण जनतेचा राजा म्हणून जी ओळख आहे, ती फक्त शिवाजी महाराजांचीच आहे’ असे उदयनराजे म्हणाले. महाबळेश्वरचा पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकास कसा होईल? याबाबत केसरकरांची भेट घेतली असे उदयनराजे यांनी सांगितले.
उदयराजेंच्या भेटीनंतर माजी खासदार संभाजीराजे यांची केसरकरांनी भेट घेतली. दीपक केसरकर यांना पर्यटनमंत्री व्हावे.असा आमचा आग्रह आहे असे यावेळी संभाजीराजे म्हणाले. दीपक केसरकर म्हणाले, ‘उदयनराजे आणि संभाजीराजे या दोघांनी मला पर्यटन स्थळांबाबत मार्गदर्शन केले आहे. मी पर्यटन मंत्री होवो किंवा न होवो मात्र आपला जो गौरवशाली इतिहास आहे तो जगासमोर आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’
दोन्ही राजांच्या केसरकरांबरोबर झालेल्या भेटीमागे पर्यावरण संवर्धन हे कारण आहे असे सांगितले जाते आहे. पण दोन्ही राजे एकाच दिवशी पुण्यात आल्यामुळे नेमकी कोणत्या मिशनची तयारी आहे अशी चर्चा रंगलेली आहे.