‘संभोगा’चे पुराणात सांगितलेले ‘दहा’ प्राचीन नियम !!

संभोग… हा विषय आजही चर्चेला खूपच कमी प्रमाणात येताना दिसतो पण पूर्वीच्या काळात समागम, संभोग याविषयांबाबत लोक खूप प्रगल्भपणे विचार करत असत हेच दिसून येतं. भारतात प्राचीन काळी संभोग हा विषय खुपच मोकळेपणाने चर्चिला जात होता त्याचा पुरावा म्हणजे लैंगिक ज्ञान देणारा पहिला भारतीय ग्रंथ ‘कामसूत्र’. कामसूत्र ग्रंथ ऋषी वात्स्यायन यांनी लिहिला आहे. संन्यासधर्माचं पालन करणाऱ्या आणि विवाह न केलेल्या वात्स्यायन यांनी कामसुत्र जगाला सांगितले. केवळ प्रणयाराधन किंवा कामसुखाबद्दलच माहिती देणारा ग्रंथ अशी कामसूत्र या ग्रंथाची ओळख आता जरी असेल तरी एकूणात जीवन जगण्याच्या कलेविषयी माहिती देणारा हा ग्रंथ आहे.

हे आहेत संभोगाचे पुराणात वर्णन केलेले १० प्राचीन नियम !!

१. प्रदीर्घ आयुष्यासाठी, मनाचे आणि शरीराचे चांगले आरोग्य मिळवण्यासाठी त्याचबरोबर सहचर्यातून लाभणारे सुख आणि वंश वाढवण्यासाठी संभोग महत्त्वपूर्ण आहे. ज्या व्यक्तींच्या संभोगात नियमितता आहे, त्यांना त्रास तब्येतीच्या फारशा समस्या जाणवत नाहीत. पती आणि पत्नीमधील नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी संभोग हा पाया होता, असं प्राचीन नियमांमध्ये आढळून येतं. यामध्ये प्रेमभाव असणं आवश्यक आहेच. त्यात केवळ कामभाव असण्यापेक्षा प्रेमपूर्वक संभोग करणं अधिक बरोबर असतं. या लेखाद्वारे त्याच नियमांची माहिती घ्यायची आहे.

२. महिलांना विवाहापूर्वी संभोगाची माहिती असणे महत्त्वाचे आहे. घरातील वयाने मोठ्या असणाऱ्या स्त्रियांनी मुलींना संभोग शास्त्राची ओळख आणि त्याची आवश्यकता याचं ज्ञान देणं गरजेचं आहे. असं म्हणतात की, जी स्त्रीला संभोगाचं ज्ञान आहे, तिचा नवरा कायम तिच्या मुठीत राहू शकेल. सहजीवन यामुळेच एकदम सुखी होऊ शकतं.

३. सकाळ – संध्याकाळच्या समयी पूजेच्या वेळी कोणत्याही जोडप्याने संभोग करू नये, बह्म वैवर्त पुराणात असं सांगितलं आहे. सूर्याचा उदयास्त, ग्रहण, श्रावण मास, भद्रा, श्राद्ध,दिवाकाल, पौर्णिमा-अमावस्या, संक्रात, नवरात्र, चतुर्थी आणि ऋतुकाल असताना संभोग करणं टाळावं, असं प्राचीन काळी सांगितलं जात असे.

४. कोणीही आपल्या पती अथवा पत्नीखेरीज अन्य कोणत्याही व्यक्तींशी समागम करु नये, कारण हे अनैतिक आहे. यामुळे संपूर्ण जीवन पश्चात्ताप करावा लागतो.

५. गर्भवती महिलांनी गर्भारपणात सेक्स करू नये. त्यामुळे पुढची पिढी पंगु होण्याचा संभव असतो, अशी मान्यता आहे. गरोदर असताना संभोग करू नये, असं हल्ली डॉक्टरही सांगतात.

६. रात्रीच्या पहिल्या प्रहरी समागम केल्याचा फायदा होतो, असं प्राचीन नियम सांगतात. मध्यरात्रीचा प्रहर हा योग्य समजण्यात येत नाही. यासमयी केलेल्या संभोगातून निर्माण झालेल्या पिढीचा स्वभाव राक्षसी होतो तसेच मानसिक आजार ही होऊ शकतात, असं पुराणं म्हणतात.

७. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काळातील दिवसांत समागम करू नये. या काळात संभोग केला असता पुरुष आजारे पडू शकतो. मासिक पाळी संपल्यानंतर पुढील चार दिवसानंतर संभोग करणं योग्य आहे असं सांगितलं गेलं आहे. त्यामुळे गर्भधारणेसाठी योग्य काल असतो, असंही म्हणतात.

८. संभोग करण्यापूर्वी इंद्रीयांची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जंतुसंसर्गाचा त्रास होत नाही. म्हणून संभोगापूर्वी आंघोळीला महत्त्व देण्यात आलंय. तुमचा जोडीदाराची इच्छा नसेल किंवा त्याला उत्साह नसेल तर संभोग करू नये. संभोग करताना जोर-जबरदस्ती बलपूर्वक वागणं अयोग्य आहे. असे केल्यामुळे संतती चांगली होत नाही.

९.पुराणे असं म्हणतात की उद्यान, सार्वजनिक स्थान,पवित्र स्थळ किंवा वृक्षाजवळ, गुरुकुल, स्मशान, चिकित्सालय, दवाखाने, मंदिर, वधस्थळ, गुरू आणि अध्यापक यांच्या घरी संभोग करणं टाळावं. जर का असं घडलं तर ती व्यक्ती खूप आजारी पडू शकते.

१०. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान अशा पाच वायूंनी आपलं शरीर बनलं असल्याचं सांगण्यात आलं आहे. मल, मूत्र, शुक्र, गर्भ आणि आर्तव बाहेर काढणे, हे त्यातील अपान वायूचे कार्यआहे. यात वीर्यात शुक्राणू असतात. म्हणून संभोग केला असता हे वायू चांगले राहतात.

या प्राचीन नियमाप्रमाणे वागून जर समागम केला तर वंशवेल वाढतो. मैत्रीलाभ होतो. सहचर्य सुखाचा लाभ होतो. व्यक्ती मानसिकरित्या परिपक्व होतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य नीट राहून दीर्घायुष्य मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.