संदीपान भुमरेंचा मोठा दावा, म्हणाले, “उद्धव ठाकरेंसोबतच्या १०-१२ आमदारांपैकी…!”

एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि शिवसेनेत उभी फूट पडली. आजपर्यंतचा सर्वात मोठा बंड म्हणून याकडे पाहिले जाते. या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे सरकार राज्यात आलं. आता शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे अथक प्रयत्न करताना दिसत आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट दोघेही एकमेकांवर टीक करताना दिसत आहेत.

दरम्यान शिंदे गटातील आमदार संदीपान भुमरे यांनी औरंगाबादच्या पैठणमध्ये एका सभेत बोलताना मोठा दावा केला आहे. शिंदे सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर पहिल्यांजा भुमरे पैठणमध्ये आले होते. त्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यां दिसल्या याची चर्चा रंगलेली असताना भुमरेंनी जो दावा केलाय त्याची जास्त चर्चा होते आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे भुमरे म्हणाले आहेत. भुमरे म्हणाले, त्यांच्याकडे (उद्धव ठाकरे) जे काही १०-१२ आमदार आहेत, त्यातले परवाच एक मला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले. ते म्हणाले कसं करू साहेब.. मी म्हटलं काही हरकत नाही, या इकडे असं भुमरे यांनी यावेळी सांगितले.संदीपान भुमरेंच्या दाव्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पहायला मिळते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.