‘द सँडमॅन’चा ट्रेलर रिलीज !!

नेटफ्लिक्सवर नेहमीच आपल्याला हटके विषयावर आधारीत सिनेमा आणि वेबसिरीज पहायला मिळते. असात एक वेगळा विषय घेवून नेटफ्लिक्स आपल्या भेटीला येत आहे. नील गॅमन यांच्या कादंबरीवर आधारित द सँडमॅन ही वेबसिरीज ५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. द सँडमॅनचा ट्रेलर रिलीज झाला असून नेटकऱ्यांनी त्याला पसंतीची पावती दिली आहे.

अभिनेता टॉम स्ट्रीज द सँडमॅन या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा ट्रेलर पाहिला असता एका राजपुत्राच्या जीवनावर आधारीत कथा आहे असे वाटते आहे. रहस्य, जादू आणि विज्ञानाचे आविष्कार अशा अनेक गोष्टींचा संगम द सँडमॅन या वेबसिरीजमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. ५ ऑगस्टला आपल्याला द सँडमॅन ही वेबसिरीज पाहता येईल याचे एकूण दहा भाग असून प्रत्येक भागात काहीतरी नावीन्यपूर्ण, नाट्यमय आणि मनोरंजक पहायला मिळेल असे मत नेटफ्लिक्सद्वारे व्यक्त करण्यात आले आहे.द सँडमॅन ही वेबसिरीज इंग्रजीबरोबर हिंदीमध्ये आपल्याला पहाता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.