शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न !

शिवसेनेचे खासदास संजय राऊत यांना पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी मध्यरात्री ईडीने अटक केली. रविवारी सखोल चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. राऊत यांना अटक केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून शिवसैनिकांनी राज्यात आंदोलन करायला सुरुवात केली आहे. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी ‘हे सगळे बोगस प्रकरण असून सोमय्या गँगचा राऊतांना अडकवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप केला आहे. भाजप सु़डबुद्धीने कारवाई करत असून उद्धव ठाकरे यांना एकटं पाडून शिवसेना संपविण्याचा हा प्लॅन आहे’ असे ही सुनील राऊत म्हणाले.

दरम्यान संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसदेखील राऊतांच्या अटकेविरोधात आंदोलन करणार आहे. संजय राऊत नेहमीच शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जवळ असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळेच राऊतांच्या मागे राष्ट्रवादीने आपली ताकद उभी केली आहे असे मत व्यक्त केले जाते आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ‘संजय राऊत यांची अटक म्हणजे देशातील भयाण वास्तवाची जाणीव करून देणारी’ असे म्हणत भाजपवर टीका केली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.