दसरा मेळाव्याच्या वादात राऊतांची उडी!

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढलेला असून त्यांच्या कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ झालेली आहे. मुंबईतील गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत मागील 50 दिवसांपासून तुरुंगात आहेत. दरम्या काल त्यांच्या जामीनावर सुनावणी होती. त्यावेळी संजय राऊत यांच्या सोबत त्यांचे बंधू होते. यावेळी शिवसेना नेते अनिल देसाई आणि चंद्रकांत खैरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यााच प्रश्न मार्गी लावण्याची सुचना दिलेली आहे अशी माहिती आता समोर आलीय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला असताना शिंदे गटाकडूनही शिवाजी पार्कसाठीच आग्रह धरला जातोय.यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो त्यामुळे परवानगी मिळाली नाही तरी शिवाजी पार्कातच मेळावा घ्यावा. राज्यात शिवसेनेत फुट पडली असून सत्तांतर झाल्यानंतरचा हा पहिलाचा दसरा मेळावा असणार आहे. तर बंडखोरी केल्यानंतर शिंदेगटाचा सुद्धा हा पहिलाच दसरा मेळावा आहे त्यामुळे यंदाच्या दसरा मेळावा खास असणार आहे. आपणच खरी शिवसेना हे दाखविण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होतोच आहे त्यात दसरा मेळावा घेवून त्यावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करणार आहेत.
बीकेसी मैदानात मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला परवानगी मिळालेली आहे पण उद्धव ठाकरे यांना अद्याप कोणत्याही मैदानासाठी परवानगी मिळालेली नाही. आता शिवाजी पार्क मैदानावर कोणाला परवानगी मिळणार हे पहावं लागणार आहे याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केलेल्या सुचना महत्त्वपूर्ण ठरत आहेत.