वेदांता फॉक्सकॉन निसटला, संजय राऊतांच्या शेवटच्या विधानाची का होतेय चर्चा?

वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटला अन् राज्याचं राजकारण तापलं. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सगळीकडे तीच चर्चा सुरु आहे. आरोप-प्रत्योरोप होत आहेत. एकमेकांवर ताशेरे ओढत तुम्हीच जबाबदार आहात असं म्हटलं जातंय. दरम्यान सोशल मीडियवार नेटकऱ्यांना एका व्यक्तीची खास आठवण येतेय ती म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत जे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
संजय राऊतांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी एक शब्द बोलेले नाहीत पण तरीही सध्या सोशल मीडियावर त्यांच्याच एका विधानाची चर्चा आहे. पोलिसांनी जेव्हा राऊतांना अटक केली तेव्हा जाताता संजय राऊतांनी एक विधान केलं होतं, ‘ पेढे वाटा पेढे, महाराष्ट्र कमकुवत होतोय’ याच विधानाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
@rautsanjay61 साहेब तुम्ही इडी कार्यालयात जातांना म्हणाला होता.”पेढे वाटा , महाराष्ट कमजोर होतोय.”आणि म्हणुनच महाराष्ट्र तुम्हाला मिस करतोय.! कारण आता महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहे.
— Kuchik Raghunath (@KuchikR) September 15, 2022
अशावेळेस सकाळी संध्याकाळी तुमचा कडक आवाजातला होणारा विरोध खुप महत्वाचा आहे. pic.twitter.com/TXcDnKWp2d
शिवसेनेच्या अनेक समर्थकांनी संजय राऊतांचा तो व्हिडीओ व्हायरल केलाय. काही जणांनी ट्वीट करत संजय राऊतांचं हे विधान शेअर केलं आहे. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनीही याविषयी ट्वीट केलंय, महाराष्ट्र तुम्हाला मिस करतोय. कारण आता महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवले जाताये. तर महाराष्ट्र कमजोर होतोय हे संजय राऊतांचं विधान आता खरं ठरत असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.