मातोश्री ते दिल्ली, संजय राऊतांच्या जामीनासाठी भाजपा तयार होईल?

शिवसेनेचे खासदार आणि फायर फायटर नेते संजय राऊत पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांची कोठडी सतत वाढत असून जामीनासाठी अर्ज करण्यात आलाय पण त्यावर काही उत्तर आलेले नाही. दरम्यान एक मोठी बातमी समोर आलीय संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत आपल्या भावाला तुरुंगाबाहेर काढण्यासाठी एक आगळावेगळा प्रयत्न करतायेत. कोणाला विश्वास बसणरा नाही असं कनेक्शन संजय राऊत यांनी शोधलंय अशी जोरदार चर्चा होतेय.
शुक्रवारी अचानक सुनील राऊत मातोश्रीवर गेले होते. त्यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट अचानक ठरली होती. या भेटीनंतर सुनील राऊत यांनी पत्रकारांना सांगितले ठाकरेंनी कुटुंबाची चौकशी करायला बोलावले होते. त्यानंतर राऊतांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला. पण यानंतर म्हणजे मातोश्रीच्या भेटीनंतर संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत थेट मुंबई विमानतळाकडून दिल्लीला रवाना झाले.
आता सुनील राऊत दिल्लीला का गेले?याबाबत असे सांगण्यात येत आहे की सुनील राऊत हे दिल्लीत ईडीच्या वकिलांना भेटायला गेले आहेत. भाजपाच्या बड्या नेत्याकडून यात मध्यस्थीचा प्रयत्न असल्याचंही बोललं जातंय. आता यात प्रश्न आहे संजय राऊत यांना खरोखर भाजपाकडून सॉफ्ट कॉर्नर दिला जाईल का? संजय राऊत यांच्याविरोधात आज भाजपाचे डझनाहून जास्त नेते आहेत, ते संजय राऊत यांना जामीन द्यावा, हे मनापासून मान्य करतील का?
संजय राऊत यांची सुटका व्हावी, दरवाजा आड एक तह होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आलीय. बरं असा काही तह झाला तर तो भाजपातील नेत्यांना मान्य होईल का? मातोश्रीसोबत आपलं नातं अधिक विश्वासाचं आणि घट्ट आहे हे दाखवून दिलं. ते राऊत यूटर्न घेतील का? भाजपा नेते किरिट सोमय्या यानंतर शांततेची भूमिका घेतील का? दुसरीकडे संजय राऊत हा अनोखा तह झाला, तर बाहेर येऊन शांत बसतील का, किंवा भाजपासोबतचा कथित तह होईल, तर तो मान्य करतील का? संजय राऊत जेलमध्ये राहण्याच्या भीतीने तयार होतील असं वाटतं का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारले जात आहेत.