संजय राऊत तुरुंगात बसून पेटी वाजवतायेत? राणेंनी शेअर केला व्हायरल व्हिडीओ

मुंबईमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. राऊतांची कोठडी ८ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.दरम्यान संजय राऊत कोठडीत बसून मस्तपैकी पेटी वाजवतायेत असा टोला भाजपा नेते निलेश राणे यांनी लगावला आहे. निलेश राणे नेहमीच ट्विटच्या माध्यमातून शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका करत असतात. आता निलेश राणे यांनी संजय राऊत तुरुंगात बसून पेटी वाजवत आहे असा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.
निलेश राणे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ करुन तयार केलेला आहे. राऊत यांचा पेटी वाजविण्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला होता तोच व्हिडीओ घेवून त्याला एडीट करुन तुरुंगात असण्याचे भासविलेले आहे. तुरुंगात एक खिडकीसुद्धा दाखविण्यात आली आहे कारण राऊत यांनी कोर्टात ईडीच्या विरोधात तक्रार करताना जिथे मला ठेवले आहे तिथे खिडकी नाही अशी तक्रार केली होती. जेलमध्ये खिडकीवाली खोली मिळाल्याचा आनंद अशी कॅप्शन निलेश राणे यांनी दिलेली आहे.