संजय शिरसाट, बच्चू कडूंची नाराजी पुढच्या पंधरा दिवसात दूर होणार?

शिंदे-भाजप सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार ५ ऑक्टोबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. नव्या मंत्र्यांच्या नावावर चर्चा झाली असून ती अंतिम करण्याचे काम सुरु आहे असेही सांगण्यात आलेले आहे. तेव्हा आता पहिल्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या संजय शिरसाट, बच्चू कडू या आमदारांची नाराजी दूर होण्याची आशा आहे.

शिंदे सरकार राज्यात आल्यानंतर दीड महिन्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. हा मंत्रिमंडळ विस्तार अतिशय छोटेखानी होता त्यामुळे अनेक इच्छुक मंत्र्यांची नाराजी देखील झाली. त्याचबरोबर भाजप आणि शिंदे गटाने अपक्षांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं नाही. संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्यासह काहीजणांनी उघडपणे ही नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्राशी बोलताना कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल भाष्य केलं होतं. मंत्रिमंडळ विस्तार ऑक्टोबरमध्ये म्हणजेच दिवाळीपूर्वी होईल. २८८ आमदारांच्या १५ टक्के मंत्री होऊ शकतात. त्यामुळे मंत्रिमंडळ ४३ जणांचं असेल अशी माहिती देखील मुनगंटीवार यांनी दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.