चिंता वाढली ! आईच्या दूधात आढळलं ‘मायक्रोप्लास्टिक’

नवजात बाळासाठी सर्वात पोषक गोष्ट कोणती तर आईचे दूध ! आईच्या दुधातील पोषक तत्व बाळाला निरोगी राहण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. पण बाळाला नवसंजीवनी ठरणाऱ्या या दुधात चक्क मायक्रोप्लास्टिक आढळलेले आहे. अशी धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आलेली आहे. इटलीतील एका संशोधकांच्या पथकानं आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक शोधले आहे. त्या दुधामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केलीय.
संशोधकांनी रोम, इटली मधून बाळाला जन्म दिल्यानंतर एका आठवड्यानंतर एकूण 34 मातांकडून दुधाचे नमुने घेतले होते. यामध्ये ७५ % दूधाच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळून आलेले आहे.आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक सापडले संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. गर्भवती असताना महिला आपल्या दैनंदिन व्यवहारात प्लास्टिक किंवा प्लास्टिकयुक्त उत्पादनांचा वापर करतात पण याचा मायक्रोप्लास्टिकच्या उपस्थितीशी कोणताही संबंध नाही असेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे.