किंग खान आणि भाईजान 20 वर्षांनी येणार एकत्र?

बॉलिवूडमध्ये रंगलेला एक वाद होता किंग खान शाहरुख आणि भाईजान सलमानचा. त्यांच्या दोस्तीची मोठी चर्चा रंगत असे. पण एक काळ असाही होता जेव्हा एसआरके आणि भाईजान यांच्यात मोठा अबोला निर्माण झाला होता. पण काही वर्षातच त्यांनी आपलं भांडण मिटवलं. असं असलं तरी हे दोन खान एकत्र कोणत्याच सिनेमात पुन्हा दिसले नव्हते. मात्र आता फॅन्सनि जलोष करायला हरकत नाही कारण त्यांचे करण अर्जुन पुन्हा एकत्र यायचे संकेत दिसून येत आहेत. शाहरुख आणि सलमान हे आदित्य चोप्राच्या सिनेमात एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऍक्शन फिल्म हा सलमानचा हातखंडा आहे तर येत्या काळात किंग खानसुद्धा एका ऍक्शन फिल्मसह 2023 मध्ये कमबॅक करत आहे. त्यामुळे त्यांना एकत्र एका ऍक्शनपटात पाहायला चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.शाहरुखने आदित्य चोप्राच्या बिगबजेट ऍक्शन फिल्मसाठी होकार दिल्याचं समजत आहे तसंच आपल्या जुन्या मित्रासोबत काम करायला सलमानने सुद्धा संमती दिल्याचं समोर येत आहे. ही ऍक्शन फिल्म भारतातल्या काही मोजक्या भव्यदिव्य ऍक्शन फिल्मपैकी एक असणार आहे असं सुद्धा म्हणलं जात आहे.
काहीच दिवसांपूर्वी शाहरुख आणि सलमान यांचा एकमॆनांसोबत वेळ घालवतानाचा एक विडिओ शोष मीडियावर viral होत होता. हे दोन्ही कलाकार असलेला ग्रँड सिनेमा कसा असेल त्याबद्दल आता बरीच उत्सुकता दिसून येतेय.