शरद पवार… शरद पवार हे महाराष्ट्र राज्याचेच नव्हे तर देशाच्या राजकारणातील ध्रुवतारा…
आपल्या राजकीय प्रगल्भतेने, महाराष्ट्रावर असलेल्या प्रभावाने आणि सहा दशकांच्या अनुभवाने ते राजकारणाचं चालतं-बोलतं विद्यापीठ बनले आहेत. त्यांच्या निर्णयक्षमता आणि दूरदृष्टीमुळे राजकीय क्षेत्रात ते अनोखी उंची गाठून आहेत. साहेबांच्या या सामर्थ्यपूर्ण व्यक्तिमत्त्वामुळे अनेकजण त्यांचं कौतुक करतात, तर काही त्यांच्या कामावर ताशेरे ओढून मोठं होण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक वेळी शरद पवारांवर टीका करणारे अनेक जण स्वतःच अडचणीत सापडतात. जे कोणी त्यांच्याविरोधात उभं राहण्याचा प्रयत्न करतात, त्यांना पराभवाची चव चाखावी लागते. म्हणूनच आजवर शरद पवारांवर कोणी टीका केल्या आणि त्यांच्या त्या टीकेचा काय परिणाम झाला तेच जाणून घेऊयात.
सर्वात पाहिलं बोलूयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल. २०१९ मध्ये एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा era आता संपलाय असं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. पण त्यांच्या या वक्तव्याच्या काहीच काळानंतर देवेंद्र फडणवीस यांना माजी मुख्यमंत्री बनवत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले व पवारांचा era संपला असं म्हणणाऱ्या फडणवीसांनाकडे बहुमत सोबत असून देखील विरोधी बाकावर बसायला लागलं.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवारांवर टीका करत तोंडसुख घेतलं होत. ज्यात पवारांना भटकती आत्मा म्हणत मोदींनी पवारांना टार्गेट केलं होत. २०२४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान मोदींनी हे वक्तव्य केलं होत परिणामी ‘४०० पार’ चा नारा देणारी भाजप २४० वरचं थांबली आणि महाराष्ट्रात भाजपाला फक्त ९ जागांवर समाधान मानावं लागलं आणि हे कमी म्हणून कि काय पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांसारख्या भाजपच्या दिग्गजांना पराभव पत्करावा लागला.
शरद पवारांवर टीका करणार पुढच नाव आहे चंद्रकांत पाटलांचं! ‘शरद पवारांचा पराभव…. इतना काफी है’ असं म्हणत पाटलांनी पवारांच्या विरोधात रणशिंग फुंकलं. २०२४ लोकसभा निवडणूकांची तयारी सुरु असताना महायुतीकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शिरुर व बारामती मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. यावेळी बारामतीत बोलताना चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलं होत. ज्याचा परिणाम निवडणुकांच्या निकालांमधून दिसून आला. शिरूर मध्ये अमोल कोल्हे तर बारामती मध्ये सुप्रिया सुळे दोन्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते विजयी झाले. आणि पक्षाने सोपवलेली जबाबदारी चंद्रकांत पाटलांना निभावता आली नाही.
यासर्व टीकांच्या वर जत येथील महायुतीच्या सभेत भाषणादरम्यान सदाभाऊ खोत यांनी बोलता बोलता शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका केली. परिणामी खोत यांच्या भाषणातील वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते व नेतेही आक्रमक झाले. दरम्यान या विधानावरून चहूबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊ खोत नरमले आणि बॅकफूटवर जात त्यांनी माफी जरी मागितली असली तरी देखील त्यांनी केलेल्या गंभीर टीकेनंतर हे प्रकरण इतक्यात निवळेल असं काही वाटत नाही.
आजवर शरद पवारांवर ज्यांनी कोणी टीका केली त्यांना मोठा फटका बसल्याच पहायला मिळालं. आजवर कोणीच शरद पवारांवर टीका करून वाचू शकला नाही. त्यामुळे आता सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या या टीकेचे कोणते परिणाम त्यांना भोगावे लागणार हे पहावे लागेल. दरम्यान सदाभाऊंनी केलेल्या या घनाघाती टिकेचे सदाभाऊ खोत यांच्या सोबतच महायुतीला देखील परिणाम भोगावे लागतील असा अंदाज अनेक राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान यावर तुमचे मत काय ? ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा…