ब्राह्मणांनी पापक्षालन करावं का? ब्राह्मण महासंघाचा आक्षेप तर शरद पवारांची भूमिका काय?

ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये केलं होतं. त्यांच्या या विधानाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. ब्राह्मण महासंघानेही भगवंतांच्या या विधानावर टीका केली आहे.भागवतांचे वक्तव्य चुकीचे आणि पूर्ण अभ्यासाशिवाय केलेलं आहे. त्याकाळी काही ब्राह्मणांनी चुका केल्या असतील. पण ब्राह्मण समाजामधील काही लोकांनी त्यांना विरोधही केला आहे. परंतु, असे न म्हणता सरसकट ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याचं विधान त्यांनी केलं अशी प्रतिक्रिया ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेली आहे.

“नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाबाबत भूमिका कशी घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. समाजामधील एका मोठ्या वर्गाच्या काही पिढ्यांना यातना सहन कराव्या लागल्या होत्या. या यातनांची जाणीव त्या घटकाला होते आहे, हा योग्य बदल आहे. पण, नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाबाबत भूमिका कशी घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.