भविष्यात शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येणार?; CM शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदेंकडून एकमेकांवर टोलबाजी केली जातच असते.सध्या मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जास्तीत जास्त लक्ष्य करत आहेत असे दिसते आहे. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात शिंदेंनी ठाकरेंची कोंडी केलेली आहे. शिंदेंना आत पूर्णपणे शिवसेनेची सुत्र हातात घ्यायची आहे असेच दिसते आहे.
दरम्यान एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण असतील? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा शिंदे म्हणाले, मुख्यमंत्रीपद जावू द्या शिवसेना वाढविणे आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेणे हेच आमचे काम आहे. बाळासाहेबांनी कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध केला. त्या विचारांपासून आम्ही फारकत घेतली. दाऊदचे हस्तक असलेल्या मंत्र्याच्या विरोधात आम्ही काहीच कारवाई करू शकलो नाही अशी खंत देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला होता तो म्हणजे नव्या शिवसेनेत बाळासाहेबांच्या दुसऱ्या (उद्धव ठाकरे) आणि तिसऱ्या (आदित्य ठाकरे) पिढीचं स्थान काय असेल? या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, “हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. मात्र आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे काही जणांची अडचण झालीये. आमची भूमिका स्वच्छ आहे. ती म्हणजे बाळासाहेबांचे विचार पुढे गेले पाहिजेत”, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.भविष्यात शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याबद्दल एकनाथ शिंदे यांना विचारले असता भविष्याचं काय सांगता येत नाही. सध्या चाललं आहे, ते तर आपण बघता आहातच असे उत्तर देत शिंदेंनी अधिकच बोलणं टाळलं.