काय सांगता? ‘ठाकरेंची वरात शिंदेंच्या दारात’ !

सध्या राज्यात चर्चा सुरु आहे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट तयार झालेत एक आहे शिंदे गट तर दुसरा ठाकरे गट. दोघेही आपणच खरी शिवसेना हे सांगण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत. आता दसरा मेळाव्यात दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शन करून एकमेकांवक टीकेची झोड उठवली होती. दोघांची तुफान राजकीय फटकेबाजी दसरा मेळाव्यात पहायला मिळाली. तसं पाहिलं तर आता एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा रोज सामना रंगत आहे. मात्र या सगळ्यात एका लग्नपत्रिकेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता तुम्ही म्हणाल शिंदे-ठाकरे वादात विवाहाची पत्रिका म्हणजे काय?

जुन्नरमधील ठाकरे आणि शिंदे कुटुंबिय यांच्यात सोयरीक झाली आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. ठाकरेंची वरात शिंदेंच्या दारात जाणार अशी चर्चा आहे. वडगावसहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या चि. सौ. का. अनुराधा यांचा शुभविवाह होणार आहे. त्यांच्याच लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेली आहे.

८ ऑक्टोबर २०२२ रोजी विवाहसोहळा होणार असून सध्याच्या राजकीय तणावाच्या वातावरणात त्यांच्या लग्नपत्रिकेमुळे पुणे जिल्ह्यात शिंदे आणि ठाकरे यांच्या नव्या नातेसंबंधामुळे सर्वसामान्य लोकांच्या चेहर्‍यावर आनंद पाहायला मिळतोय. त्यामुळे लोकांची चांगलीच करमणूकसुद्धा होतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्यात ही पत्रिका चांगलीच भाव खावून जातेय. आमचं लग्न ठरताना अशा प्रकारची प्रसिद्धी मिळेत असं वाटलं नव्हतं. मात्र त्यानंतर राजकीय वातावरण पाहून आणि मिळत असलेली प्रसिद्धी पाहून आनंद होतोय अशा भावना वर विशाल शिंदे यांने व्यक्त केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.