शिवसेनेचे काय होणार? उद्धव ठाकरे सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार..पण कधी?

एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड ४० आमदारांचा त्यांना मिळालेला पाठिंबा. त्यानंतर राज्यात झालेलं सत्तांतर यावर उद्धव ठाकरे अद्याप स्पष्ट असे काहीही बोललेले नाहीत. मात्र दोन गटामुळे पक्षात उभी फूट पडली असून शिवसेनेच्या अस्तित्वाचा निर्माण झाला आहे याबाबत आता उद्धव ठाकरे रोखठोक बोलणार आहेत.शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी प्रकाशित होणार आहे. संजय राऊत यांनी ही माहित दिली असून त्यांनीच उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतलेली आहे.
या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात, बंडखोरांबद्दल काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. एका प्रश्नाच्या वेळी संजय राऊत म्हणालेत, फुटीर गटाने तुम्हाला एक विनंती केली आहे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले आहेत बोला…मी मान्य करतो. आता ठाकरे यांनी बंडखोरांचे नेमके काय बोलणे मान्य केले आहे याची उत्सूकता सगळ्यांनाच लागलेली आहे.
बंडखोरीनंंतर शिवसेना अधिक मजबूत ठेवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला असून शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. आदित्य यांच्या शिवसंवदा यात्रेला चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे.