दुपारी शिंदे गटात, संध्याकाळी मातोश्रीवर? वरळीतील राजकीय ड्राम्याबाबत खुलासा

दसरा मेळाव्याआधीच मुंबईमध्ये राजकीय वातावरण तापलेले आहे. रविवारी शिवसेन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात मोठा राजकीय ड्रामा पहायला मिळाला. दुपारी शिंदे गटात सामील झालेले शिवसेना पदाधिकारी संध्याकाळी चक्क मातोश्रीवर दाखल झाले होते.
यामागचे खरे कारण असे रविवारी दुपारी वरळीमधील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. वरळी येथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले होते. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याच मतदारसंघातील शेकडो शिवसैनिक आता शिंदे गटाच्या बाजूने आलेले आहेत अशी चर्चा होती. पण ही बातमी खोटी असल्याचा दावा वरळीमधील पदाधिकाऱ्यांनी केलेल आहे. वरळी कोळीवाड्या मधील सगळे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, नगरसेवक, उपविभाग प्रमुख सर्व एकत्र येऊन संध्याकाळी मातोश्रीवर दाखल झाले होते.
दरम्यान जे गेले ते दोन चार दिवसात स्वतः येऊन खुलासा करतील असे शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शिंदे यांनी सांगीतले.महाराष्ट्र एका बाजूला आणि आम्ही वरळीकर एका बाजूला असं चित्र ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय.आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी एक मोठा कट रचला जात असल्याचा आरोपही शिवसैनिकांनी केला.
रविवारी वर्षा बंगल्यावर कोळी बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते कारण त्यांना त्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांना सांगायच्या होत्या. कोळी बांधवांनी वेगवेगळ्या समस्यांचे निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांना दिले. यावेळी शिक्षक संघटनासुद्धा आपले निवदेन देण्यासाठी तिथे आली होती. या सर्व गर्दीमुळे मोठ्या संख्येत शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले असे सांगण्यात आले पण तो दावा खोटा होता असे वरळीमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितली.