उदय सामंत यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला !

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले आहे. एक आहे शिंदे गट तर दुसरा ठाकरे गट, दोघेही आपणच शिवसेना असे सांगत आहेत. दोन्ही बाजूंकडून दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होत आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री शिंदे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सभा पुण्यात होत्या. सत्ता पलट झाल्यानंतर दोघेही एकमेकांसमोर येत होते. दोघांचे मेळावे, कार्यक्रम चांगल्याप्रकारे पार पडले पण पुण्यातील कात्रज चौकात ठाकरे समर्थनकांनी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात एकजण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
मुख्यमंत्री शिंद पुणे येथे दौऱ्यानिमित्त गेले होते. शिंदे पुण्यातील दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेणार होते त्यासाठी उदय सामंत दगडुशेठच्या दिशेने निघाले होते तिथेच शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. उदय सामंत यांची गाडी येताना दिसताच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला आणि दगडफेक करण्यात आली यातचं एकजण जखमी झाला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री शिंदे शंकर महाराज मठात होते.
गद्दार-गद्दार असे म्हणत शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला याच कात्रज भागात आदित्य ठाकरे यांची सभा होती. या भागातून उदय सामंत मुंबईच्या दिशेने जात असताना वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळीच शिवसैनिकांनी उदय सामंत यांची गाडी अडवली अशी माहित समोर आली आहे. पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीमारसुद्धा केला. हा हल्ला शिवसैनिकांनी केलेला नाही असे आदित्य ठाकरे आणि विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
गेल्या दीड महिन्यापासून शिंदे गट आणि शिवसेना गट यांच्यात वाक् युद्ध पहायला मिळत होतं. मात्र दोन्ही गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. डोंबिवलीत शिवसेना शाखेमध्ये दुपारी राडा झाला होता. तर आता कात्रजमध्ये उदय सामंत यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. ‘हा हल्ला पुर्वनियोजीत असून ज्यांनी हल्ला केला त्यांच्या हातात लाठ्या होत्या. ते शिव्या देत होते. जर कोणाच्या सांगण्यावरून हा हल्ला झाला असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. निषेधाचं हे माध्यम असून शकत नाही.’ असं उदया सामंत म्हणालेत.