शिवेसनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर, मग निर्णय कधी? जाणून घ्या!

शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाचा फैसला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार होता पण आज धनुष्यबाणाचा निर्णय होणार नाही अशी माहिती समोर आलेली आहे.आज धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. कारण अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आजच घेतला जाईल, अशी दाट शक्यता सुद्धा वर्तवली जात होती. दरम्यान, आज फैसला होणार नसल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हाबाबत पुरावे सादर करण्यासाठी दिलेली मुदतही आज संपली आहे. शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लवकरात लवकर घेतला जावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय लवकर होण्याची शक्यता होत मात्र हा फैसला पुन्हा लांबणीवर पडलाय.
दरम्यान शिवसेना नेते दुपारी एक वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार आहे. त्यासाठी अनिल देसाई नवी दिल्लीत दाखल झाले. धनुष्यबाण हे चिन्हा शिवसेनेकडेच राहिल, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आलाय. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांनी धनुष्यबाणासाठी आग्रह धरलेला आहे मग अशा वेळी काय होवू शकते याबाबत बोलतना ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाचा अंदाज वर्तवलाय. दोन्ही गटाकडून आग्रह झाल्यास धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाऊ शकतं, मात्र त्याआधी कागदोपत्री पुरावे तपासले जातील, असंही ते म्हणाले. त्यानंतरतही निर्णय घेणं कठीण गेलं, तर तोंडी काही गोष्टींची विचारणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते, असंदेखील निकम यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना स्पष्ट केलंय.