ठाकरेंच्या मतदारसंघात CM शिंदेंचा ट्रॅप

शिंदे आणि ठाकरे गट जेव्हापासून पडलेले आहेत तेव्हापासून कोणता खासदार, आमदार, गटनेता, पदाधिकारी कोणाकडे जाणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेनेला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे नव्या नेत्यांना पक्षात घेत आहेत. शिवसेनेची पक्षबांधणी पुन्हा मजबूत करण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत. तर शिंदे गट ठाकरेंच्या गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे घेत आहेत.
हे सगळं सुरु असताना शिवसेनेचा विशेष करुन आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत एकनाथ शिंदे यांनी ट्रॅप टाकलाय. काहि दिवसांपूर्वी शिंदे वरळीत आले होते त्यावेळी काही नेते, पदाधिकारी यांच्याबरोबर बोलणी आणि भेटी झाल्या होत्या. त्यात आता अजून एक पदाधिकारी शिंदे गटात गेल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघाच शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. वरळीतील युवासेना विभागीय चिटणीस साई किरण शेपुरी यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. असं म्हणतात की मुंबईच्या माजी महापौर किशोरी कदम यांचे शेपुरी कट्टर समर्थक होते. ठाकरे गटाकडे प्रत्येक व्यक्ती जोडली जात असताना ग्राऊंड लेव्हला काम करणारे पदाधिकारी शिंदे गटात जात असल्यामुळे एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढते आहे असे म्हटले जाते आहे.