आदित्य ठाकरेंची गाडी शिंदेंच्या घराबाहेर थांबली अन्…..

शिवसेनेत फुट पडल्यानंतर पुन्हा शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली आहे. राज्यात आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केलेल्या असून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जावून शिवसैनिकांसोबत आदित्य संवाद साधत आहेत. मेळावे घेत आहेत. आज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मेळावा घेवून बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. ठाण्यात आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनीही आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.
या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरासमोर गाडी थांबवून तिथेच शिवसैनिकांबरोबर संवाद साधला. यावेळी शिवसैनिकांची अलोट गर्दी पहायला मिळाली. शिंदे यांच्या घरासमोर आदित्य ठाकरे यांच्या संवादाची सगळीकडे चर्चा पहायला मिळाली. यानंतर आदित्या ठाकरे आणि त्यांचा ताफा पुढील कार्यक्रमासाठी निघाला.
हे सरकार कोसळणारच- आदित्य ठाकरे
शिवसैनिकांसोबत संवाद साधताना खाऊन खाऊन अपचन झालेले लोक सोडून गेले अशी टीका केली. आज जे लोक बंड आणि उठाव केला असे सांगत आहेत त्यांनी गद्दीरी केलेली आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. जे लोक आमच्या घरी यायचे आम्ही त्यांना कुटुंबातील एक समजलो होतो त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आम्ही अडीच वर्षाच्या कालावधीत कोणताही भेदभाव केला नाही. लोकांची सेवा केली. या काळात आमचं एकच चुकलं ते म्हणजे आम्हाला राजकारण करता आलं नाही.आम्ही २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण केलं. आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी आमचा विश्वासघात केला. मात्र, शिवसैनिकांवरचा विश्वास कायम राहणार असे आदित्य ठाकरे म्हणाले. सध्या जे राजकारण सुरु आहे की एक सर्कस आहे. आज जे निष्ठावंत आहेत ते शिवसैनिकांसोबत आहेत. नवीन सरकार नक्की कोसळणार म्हणजे कोसळणार आहे असे ही आदित्य ठाकरे म्हणाले.