आमदार संतोष बांगर पुन्हा चर्चेत ! अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचे दमदाटीचे व्हिडिओ सातत्याने समोर येत असतात. असाच एक ऑडिओ पुन्हा एकदा समोर आलेला आहे. त्यात आमदार संतोष बांगर यांंनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे.
अयोध्या पौळ पाटील या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी असून त्यांनी हा ऑडीओ ट्विट केलाय. या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार संतोष बांगर आणि एक अज्ञात व्यक्ती एकमेकांना अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतायेत. मुख्यमंत्री काही कारवाई करणार की नाही? की असल्या संस्कारहीन #टुकार आमदाराची पाठ थोपटणार? असा प्रश्न अयोध्या पोळ यांनी उपस्थित केलाय.
दरम्यान हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती.फक्त आमदार बांगरच नाही तर त्यांचे कार्यकर्तेसुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओ समोर आला होता.
आमदार बांगर यांनी संबंधित प्राचार्याला का मारहाण केली? याचे कारण जरी अस्पष्ट होती. या संपूर्ण प्रकारामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. वारंवार आमदार कायदेमंडळात बसून कायदे तयार करतात आणि हेच आमदार बाहेर कसे पायंदळी तुडवतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.
मुख्यमंत्री काही कारवाई करणार की नाही? की असल्या संस्कारहीन #टुकार आमदाराची पाठ थोपटणार?@CMOMaharashtra @OfficeofUT .@AUThackeray @iambadasdanve pic.twitter.com/EtcDOsnZkL
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) March 18, 2023