टेन्शन वाढलं ! शिवसेना नेते भास्कर जाधव यांना अटक होणार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायटर नेते भास्कर जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भास्कर जाधव यांच्याविरोधात आता पूर्व विदर्भातील जिल्ह्यातही पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. तर पूर्व विदर्भातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने भास्कर जाधव यांना अटक करा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रपतींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी तक्रारी करण्यात आलेली आहे.शिंदे गटाचे गोंदिया जिल्हाप्रमुख विंध शिवहरे यांच्या वतीने ही पोलीस तक्रार देण्यात आली आहे.
10 ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा होती तिथे भाषण करत असताना भास्कर जाधवांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर वक्तव्य करत त्यांची टिंगल केली असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे. यामुळे आदिवासी समाजाचा अपमान झालले आहे असे शिंदे गटाचे गोंदिया जिल्हाप्रमुख विंध शिवहरे यांचे म्हणणे आहे. आता या तक्रारीवर पोलीस काय कारवाई करतात ते पहावे लागणार आहे.