तेजस ठाकरेंचा वाढदिवस, मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, म्हणाले…

शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी युवासेना नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिवसरात्र प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान शिवसेनेला अधिक भक्कम करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे दुसरे सुपुत्र तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा होती. आज पुन्हा एकदा ही गोष्ट समोर येण्याचे कारण म्हणजे आज ७ ऑगस्ट म्हणजे तेजस ठाकरे यांचा वाढदिवस आहे. 

तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे सचिव आणि ठाकरे घराण्याचे सर्वात विश्वासू सल्लागार मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. नार्वेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, तरुण आणि प्रतिभावान तेजस ठाकरे यांना वाढिदवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वन्यजीवनात नवेशोध लावण्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप शुभेच्छा

आता मिलिंद नार्वेकर हे ठाकरे कुटुंबाचे अगदी जवळचे आहेत. त्यांनी तेजसला ट्विट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कुठेही राजकारण किंवा राजकारणातील प्रवेश या संदर्भात भाष्य केलेलं नाही. त्याचा पुसटसा उल्लेख देखील नाही. गेल्या काही दिवसात राज्यात ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्याशी फारकत घेणारे ट्विट नार्वेकर यांचे आहे. तेव्हा आता स्वतः तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार आहेत की नाही यावर काय भाष्य करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. 

उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे काही वर्षापुर्वी राजकारणात आले होते आणि ते चांगलेच त्यात स्थिरावले आहेत. शिवसेना अडचणीत असताना राज्यभर यात्रा काढून शिवसेनेला पुन्हा उभारणी देताना दिसत आहेत. बंडखोर आणि विरोधकांवर बेधडकपणे वक्तव्ये करत आहेत.याच काळात जर तेजस यांनी राजकारणात प्रवेश केला तर आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना भरभक्कम साथ मिळेल यात शंकाच नाही. आता यावर तेजस आणि ठाकेर कुटुंब काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.