राज ठाकरे यांचे भाकित खरे ठरले?

शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. राज्यभरात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधी केलेल्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा होताना दिसते आहे. राज ठाकरे यांनी आत्तापर्यंत ज्या नेत्यांबद्दल भाकित केलं आहे ते खरं ठरलेल पहायला मिळतंय.
तुम्हाला आठवत असेल १२ मार्च २०२२ रोजी जेव्हा पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला, आमचं राजकारण मिमिक्रीवर चालत नाही असे संजय राऊत म्हणाले होते त्यावर राज ठाकरे यांनी एकाच वाक्यात सुचक उत्तर दिलं होतं आता त्यांना एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतर १२ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या सभेत राज ठाकरे यांची तोफ धडाडली त्यावेळी संजय राऊत यांच्यावर टीका करताना राज ठाकरे एकच वाक्य म्हणाले होते, सध्या पवारसाहेब संजय राऊत यांच्यावर खुष आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही.
त्यानंतर ३१ जुले २०२२ रोजी संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडली आणि रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर राज ठाकरे यांनी केलेली वक्तव्ये पुन्हा चर्चे आली असून सोशल मीडियावर शेअर केली जात आहेत. राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांना अटकेचे संकते दिले होते असेही बोलले जाते आहे.