अमरावतीत राडा ! संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्लाबोल

अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. शिंदे गटातील नेते आणि उद्योग मंत्री उदय सांमत यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असताना आता अमरावतीमध्ये त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. अमरावतीमध्ये शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्यावर शिवसैनिकांनी हल्लाोबोल केलेला आहे. शिवसैनिकांनी बांगर यांची गाडी अडवत 50 खोक्के एकदम ओक्के अशी घोषणाबाजी केली.
शिंदे सरकारमध्ये अगदी अखेरच्या क्षणाला आमदार बांगर यांची एन्ट्री झाली होती. त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, टीकेची झोड उठली पण त्यानंतर आज अंजनगांव सुर्जी येथील मठातून दर्शन करुन संतोष बांगर निघाले असात शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल केला तसेच पन्नास खोके एकदम ओकेचे नारे दिल्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे